तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 15 May 2018

भुसावळ सौरऊर्जेवरील पहिले रेल्वे प्रशिक्षण केंद्र

बाळु राऊत
मुंबई : रोज सुमारे दीड हजार विविध कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी भुसावळ येथील रेल्वेची क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था (झेडआरआयटीआय) आता सौरऊर्जेवर कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे वर्षाला ७० लाख रुपयांची वीजबिलाची बचत होत आहे.
भुसावळातील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेच्या टेरेसवर ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. ही प्रणाली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई येथे एका सोहळ्यात नुकतीच राष्ट्राला अर्पण केली.
झेडआरआयटी संस्थेत साडेतीन कोटी रुपये खर्च करून हा सौरऊर्जा प्रकल्प २१ नोव्हेंबर २०१६ पासून आकारास आला आहे. त्यात ४.५३५ मे.वॅ. इतका वीजभार आहे. वर्षभरात येथे सात लाख युनिट वीज तयार होते.

No comments:

Post a Comment