तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

नातवाला वाचवताना आजीही बुडाली, दोघांचा मृत्यू.


राहाता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथे खाणीच्या पाण्यात बुडून आजी व नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमध्ये एका आठ वर्षाच्या मुलगी बुडता बुडता वाचली असून तिची तब्बेत चिंताजनक असल्याचे समजते. लिलाबाई आण्णासाहेब आहिरे (४६) आणि सुमित अनिल बागुल (१५)अशी मृत आजी व नातवाचे नाव आहे, तर अनुष्का अरुण शिंगाडे (८) हिची तब्येत चिंताजनक आहे. ही मुलं उन्हाळ्याच्या सुटीसाठी आजीकडे आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, लिलाबाई आहिरे या खाणीमधील पाण्यात धुणे धूत असताना त्यांचा नातू आणि नात हे दोघेही जवळच खेळत होते. या दरम्यान सुमीत आंघोळीसाठी पाण्यात उतरला. आंघोळ करत असताना खाणीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला, त्याची बहीण अनुष्का हिने आरडा ओरड करत त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली परतु ती देखील बुडू लागली. आपली दोन्ही नातवंडे पाण्यात बुडत असल्याचे लक्षात घेताच आजी लिलाबाई आहिरे यांनी कुठलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. मात्र खाणीत खोलवर पाणी होते आणि पोहता येत नसल्याने लिलाबाई व नातू सुमित बागुल दोघेही बुडाले. दरम्यान, आरडा ओरडा ऐकू आल्याने काही तरुणांनी पुढाकार घेऊन आजी व नातवांना पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या तिघांनाही साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना आजी आणि नातवाचा मृत्यू झाला तर आठ वर्षाची मुलगी अनुष्का हिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment