तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

जावईबापूंना 'धोंडा' जेवण एक आनंदाची पर्वणी

फुलचंद भगत-वाशिम

अवघ्या काही मैलांवर जशी भाषा बदलते तशा अगदी प्रथा परंपरा ही बदलतात. सध्या अधिक मास सुरु आहे आणि अधिक मास हा जावयाचं कोडकौतुक करण्याचा मास समजला जातो. आता कोडकौतुक करायची ही प्रत्येक घराची आणि गावाची पद्धत वेगवेगळी असते.
जावयबापू या मंडळींचा घराघरांत शब्द राखला जातो. त्यांच्या मानपानात किंचितही कसर शिल्लक ठेवली जात नाही. जावयबापूंची ही सरबराई  धोंड्याचा महिना म्हणून सुरु असते
धोंड्याच्या दिवसात अनेक जावई सासरवाडीला तळ ठोकुन असतात आणि नुसता मानमरातबच नाही, तर या जावईबापूंचं स्वागत मोठ्या झोकात करण्याची प्रथा आहे. कुणी चांदीचं भांडं देऊन जावयाचं कौतुक करतं. तर कुणी त्याला अनारसे ही खाऊ घालतात. जावयाला धोंड्याचं जेवण करुन घातलं जातं.गेली अनेक वर्षापासुन ही प्रथा मंगरुळनाथ तालुक्यात जोपासली जाते. धोंड्याचं जेवण म्हणून जेवणाच्या पदार्थात एखादा धोंडा लपवून तो जावयाला पेश केला जातो. विशेष करुन अगदी खास जावई बघून आणि हेरुन, हा धोंड्याचा पदार्थ त्याला खायला घातला जातो.आता नुसता एक जावई आला तरी माहेरी दाणादाण उडते,चार चार- पाच  पाच जावयांना एकत्र जेऊ घालायचं म्हणजे अवघडचं काम.  मेव्हण्याने,सासर्‍याने विचारलचं नाही या पिढ्यानंपिढ्याच्या तक्रारी नव्या नाहीत.
मात्र, हा सोहळा सार्वजनिक असला तरी त्याला वैयक्तिक पाहूणचाराहूनही अधिक गोडी आहे. म्हणूनच खोडी काढली तरी तक्रारीला जागा नाही. लेक आणि तिच्या नवऱ्याला वर्षातून एकदा पोटभर जेवू घालता यावं व पुण्य प्राप्त करावं मूळ हेतु असतो.                                                          फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835


No comments:

Post a Comment