तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

वाशिम देव तलाव महोत्सव निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम


वाशिम-वत्सगुल्म नगरीचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या उदात्त हेतूने येथील देव तलाव स्वच्छता व गाळ उपसण्याची मोहीम सहा मेपासून सुरू करण्यात आली.
मी वाशिमकर ग्रुप ने सुरू केलेल्या या मोहिमेत हजारो जल मित्रांचे हात लागले. देव तलावाच्या जलसंपन्नतेसाठी सुरू झालेल्या या मोहिमेच्या समापन कार्यक्रमाच्या निमित्ताने देवतलाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार 16 मे पासून रविवार 20 मेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. बुधवार 16 मे रोजी दीपोत्सव या कार्यक्रमात गंगापूजन, विष्णु पूजन ह भ प तडसे महाराज यांचे कीर्तन व महाआरतीचे आयोजन केले आहे, गुरुवार 17 मे रोजी गीतोत्सव यामध्ये स्वर्गीय शेख वसीम उर्फ राजा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित सेव्हन स्टार ऑर्केस्ट्रा ग्रुपच्यावतीने सुंदर भाव गीत व देश भक्ति गीतांचा कार्यक्रम करण्यात येणार आहे, शुक्रवार 18 मे रोजी आनंदोत्सव यामध्ये राजा भैया ढोल पथका द्वारे सुंदर प्रस्तुती करण्यात येणार आहे, शनिवार 19 मे रोजी दिव्यांग चेतन उचितकर व चमू  यांचा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, रविवारी 20 मे रोजी समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
या वाशिम देवतलाव महोत्सव निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आपण साक्षीदार व्हावे व वाशीमकर  नागरिकांनी या भव्य कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा व आर्थिक पाठबळ घ्यावे, असे आवाहन मी वाशीमकर ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.                       फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835

No comments:

Post a Comment