तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 3 May 2018

निष्ठे पुढे आ दुर्रांनींनी सोडली संधी

किरण घुंबरे पाटील

परभणी:- परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी साठी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी ३ मे रोजी गतीमान राजकीय घडामोडी घडल्या त्यात राकाँचे जिल्हाअध्यक्ष आ बाबाजानी दुर्रांनी यांचे नामनिर्देशन पत्र मोठ्या थाटामाटात भरले जाणार होते मात्र आघाडीच्या तडजोडीत ही जागा काँग्रेस पक्षाला सुटली असल्याचा पक्षश्रेष्ठींचा निरोप आ दुर्रांनी यांना थेट फोन वरून मिळाला आणि निष्ठे पुढे दुस-यांदा मिळणारी संधी सोडण्याचा कटू निर्णय आ बाबाजानी दुर्रांनी यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालत सोडला.यातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सह सर्वच पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांना निष्ठा आणि शब्द पाळणे कशाला म्हणतात असा संदेश ही दिला गेला.
आज सकाळी परभणी येथील वसमत रोड वरील राष्ट्रवादी भवन येथे वेगळीच गडबड दिसुन येत होती परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी साठी नामांकन पत्र भरण्याचा गुरूवार ३ मे शेवटचा दिवस .अर्ज भरण्या साठी दोन्ही जिल्ह्यातील राकाँ सह इतर पक्षातील आ बाबाजानी दुर्रांनी यांचे चाहते मतदार देखील या ठिकाणी उपस्थित होते. मात्र इकडे प्रदेश पातळीवर युती झाल्याची घोषणा झालेली असतांना आघाडीची बोलनी सुरू  होती. प्राप्त माहिती नुसार सकाळी सकाळी आठ-साडे आठ वाजता आ दुर्रांनी अर्ज भरण्या साठी परभणी येथे जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना थेट श्रेष्ठींचा फोन आला आणि आघाडी साठीची बोलनी सुरू आहे निर्णय काय व्हायचा तो होईल तुम्ही अर्ज भरून टाका सात तारखेला पाहू असे सांगण्यात आले. या नंतर आ दुर्रांनी हे गाडीत बसण्याच्या तयारीत असतांना पुन्हा श्रेष्ठींचा फोन खनखनला आणि बोलनी संपली परभणीची जागा काँग्रेस पक्षाला सुटली तुम्हाला संधी मिळेत पण आज अर्ज भरू नका असे खुद श्रेष्ठींनीच सांगितल्याने आ दुर्रानी यांनी ठिक आहे साहेब असे उत्तर दिले आणि इकडे परभणीत अर्ज भरण्या साठी आलेल्या कार्यकर्त्यांना हा निरोप देण्या साठी ते गाडीत बसले, या नंतर रस्त्यात जातांना प्रदेशाध्यक्ष आ जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते यांनी ही आ दुर्रांनी यांच्या भावना फोन वरून जाणून घेतल्या या दोघांनाही आ दुर्रांनी यांनी आपण अर्ज भरणार नसल्याचे सांगितले आणि पक्षाच्या राज्य पातळीवर निष्ठेची खात्री पटली या नंतर परभणीत गेल्यावर राष्ट्रवादी भवन ला जमलेल्या कार्यकर्त्यांना आ दुर्रांनी नामांकन पत्र भरणार नसल्याचे कळल्याने समर्थकांच्या भावना आक्रमक झाल्या या वेळी घोषणा बाजी झाली आ विजय भांबळे आ मधूसुदन केंद्रे यांना ही आक्रमक पणे कार्यकर्ते बोलत होते या वेळी दुर्रांनी यांनी भावनिक कार्यकर्त्यांना समजावले, त्या उपर ही कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहून अखेर प्रेमातील या समर्थकांना चांगलेच खडसावले तरीही कार्यकर्ते आक्रमक होते या नंतर तीन ही आमदारांनी एका खोलीत जाऊन पुन्हा श्रेष्ठींशी चर्चा केली आणि अर्जच न भरण्याचा निर्णय घेतला.कार्यकर्ते मात्र अर्ज भरायचाच या भावनीक निर्णयावर ठाम होते. या वेळी इकडे काँग्रेस कार्यकर्ते मात्र आता कसं तयारी नाही अशा चिंतेत होते. एैन वेळी आ दुर्रांनी काँग्रेस च्या गळाला लागतील अशी राज्य पातळी वरच्या नेत्यांची अपेक्षा ही आ दुर्रांनी यांनी फोल ठरवली. दुपारी सव्वा बारा वाजता काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे चिंताग्रस्त होत राष्ट्रवादी भवन येथे पोहचले. या वेळी काँग्रेस कडून उमेदवारी भरून निवडणुक लढवावी असा थेट प्रदेशाध्यक्षांचा निरोप फोन वरून आ दुर्रांनी यांना आला मात्र पवार यांच्या वरील निष्ठे पुढे आ दुर्रांनी यांनी तो धूडकावला आता तुम्हीच लढा मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोत पक्षा चा मी जेष्ठ नेता आणि जिल्हा अध्यक्ष असल्याने असा प्रकार होणार नसल्याचे त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना ठणकाऊन सांगितले या वेळी काँग्रेस पक्षाचा एबी फाॅर्म ही या ठिकाणी आला होता मात्र आ दुर्रांनी यांनी श्रेष्ठींना दिलेला शब्द पाळला या वेळी दुर्रांनी यांच्यावर निष्ठा असलेले हिंगोली जिल्ह्या सह परभणी जिल्ह्यातील काही अपक्ष आणि ईतर पक्षाची मतदार मंडळी ही दुर्रांनींच्या समर्थनार्थ थेट राकाँ भवनात हजर होती त्यांचा ही या घटनेने हिरमोड झाला. या वेळी पत्रकारांशी बोलतांना दुर्रांनी यांनी आघाडी धर्म पाळून आपण काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्या साठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून राकाँच्या सर्व मतदारांनी काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी उभेराहाण्याचे आवाहन केले.या वेळी मोठ्या उत्साहात राकाँ भवन येथे उपस्थित झालेले कार्यकर्ते हिरमोड झाल्याने या ठिकाणी जेवणाचा पाहूचार न घेताच अनेकजन निघून गेले.

या अनपेक्षीत घटनेचे पडसाद सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात दिसुन आले राकाँ पक्षाने एका निष्ठावन कार्यकर्त्यावर अन्याय केल्याच्या भावना राकाँ पक्षा सह इतरां मधून ही व्यक्त होत पक्षाध्यक्ष शरद पवारां सह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना या टीकेत लक्ष केल्याचे चित्र सोशल मिीयात दिसुन येत आहे. आ दुर्रानी यांच्या या निर्णयाने आणि संयमाने जनसामान्य आणि विरोधकांमध्ये ही त्यांच्या विषयी सहानुभुती व्यक्त होतांनाही दिसून येत आहे. 
    यालाच म्हणायचं श्रद्धा आणि विश्वास. संपुर्ण ताकदीनिशी निवडणुक रिंगणात उतरण्याच्या मनसुब्याने तयारी असतांना.गेली काही महिण्या पासून दोन्ही जिल्ह्यातील मतदारांशी संपर्क करत त्यांचे समर्थन मिळऊन पुन्हा दुस-या संधीची तयारी सुरू असतांना थेट श्रेष्ठींचा फोन आल्या नंतर पद असतांना ते सहज दु-याच्या गळी स्वत:उतरवायची वेळ येते आणि हसत मुखाने आदेश शिरसावंद्य मानुन प्रत्यक्ष रिंगणातून चक्क माघार घेतली जाते.स्वत:कडे असलेले दुस-याला देणे यालाच त्याग म्हणतात, याला खुप मोठं मन लागतं हे ही साहेबांच्या कार्यकर्त्यांनी समजुन घेतलं पाहीजे.कारण तुमची जशी साहेबां वर श्रद्धा आहे तशी साहेबांची श्रेष्ठींवर आहे म्हणूनच तर आजचा प्रकार झाला आहे .यातुन कार्यकर्त्यांना खुप काही शिकण्या सारखं आहे. आदेश आल्या नंतर सर्वांना शांत करत स्वत:उमेदवारी अर्जही न भरणे खुप काही सांगुन जाते. आपल्या नेतृत्वाच्या निर्णयावरचा सच्च्या कार्यकर्त्याचा विश्वास यातून दिसून येतो. सहाजिकच या प्रकारा मुळे कार्यकर्त्यांची मने दुखावली गेली आहेत. पण या अशा समयी खंबिर राहून येणा-या वेळेची जो वाट पाहातो निश्चितच त्याची फळे गोड असू शकतात. शब्द पाळणे कशाला म्हणतात ते या घटनेने दाखऊन दिले

No comments:

Post a Comment