तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

स्वराज्य रक्षक छत्रपती सभांजी महाराजांची जयंती साजरी


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथे सर्व नागरिकांनी एकत्र येत स्वराज्यविर छत्रपती संभाजी महाराज यांची 361 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात याली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, भारिप बहुजन महासंघ, लालसेना आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह शहरातील पत्रकार संघ व नागरीक यांच्या वतीने  करण्यात आले होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम भगवान (तात्या) जोगदंड, शंकरराव इंगळे किरण स्वामी,रविंद्र देशमुख, मराठा सेवा संघाचे पी. सी. पाटील,प्रभाकर सिरसाठ, मारोती रंजवे, सुरेश भोसले, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष कालिदास मस्के, प्रा. डॉ.संतोष रणखांब, राजकुमार धबडे, अंकुश परांडे, भारीप जिल्हा सचिव रुस्तुम तुपसमुद्रे, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव कोलते पाटील, कॉ. ज्ञानेश्वर मोरे, पवन बारबोले, भगवान उमरे, विकास फपाळ, कॉ. आश्रोबा उपाडे, सुरेश चव्हाण, नासेर खान पठाण, माऊली खाडे, बाबा खाडे तसेच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, भारिप, लाल सेना इत्यादिंचे कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थिति होते.

No comments:

Post a Comment