तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

तेल्हारा शहरात स्वच्छ भारत अभियानाची ‘ऐसी तैसी’

शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा

विशाल नांदोकार

तेल्हारा : स्वच्छ अभियान आज संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. त्यात तेल्हारा नगर पालिकाही अपवाद नाही. तेल्हारा नगर पालिकेने संपूर्ण शहरात मोठ्या दिमाखात ब्यानरबाजी करत ‘स्वच्छ भारत अभियान’ धुमधडाक्यात सर्वत्र राबविले. मात्र शहरातील कचर कुंड्यातील कचरा, नाल्यांमधील घाण ओसंडून वाहत आहे. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारतांना दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची ऐसी कि तैसी अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

          भारतभर स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. संपूर्ण तेल्हारा शहरात पदाधिकाऱ्यांनी मोठ्या दिमाखात ब्यानरबाजी करत ‘स्वच्छ भारत अभियान’ धुमधडाक्यात सर्वत्र राबविले मात्र याच ब्याणर खाली आता कचऱ्याचे ढीगच्या ढीग पाहायला मिळत आहे. शहरातील नाल्यांमध्ये कचराच कचरा असल्यामुळे नाल्यांमधील घाण रस्त्यावर येत आहे तर काही नागरिकांच्या घरात घुसत आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याचे काही देणे घेणे नसल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे.      

          शहरात नागरिकांना लघु शंका करायला जागाच नाही.

          शहरामधील मुख्य बाजारपेठ, स्टेट बँक परिसर, पोस्ट ऑफिस परिसर, टावर चौक, संत तुकाराम चौक, बस स्थानक चौक, मुली चौक या परिसरात तालुक्यातील नागरिकांसह शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांकरिता सार्वजनिक मुत्री घर असणे आवश्यक आहे, मात्र संपूर्ण शहरात नागरिकांना लघुशंका करायला जागाच नसल्यामुळे जागा मिळेल तेथे नागरिक लघु शंका करत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोगाचा खेळखंडोबा होत असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment