तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना सरकार देणार जमीन


मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहां साठी सरकारी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनावापर पडून असलेल्या इमारती तसेच महसूल विभागाची पडीक जमीन वसतिगृहां साठी देण्याची सूचना जिल्हाधिकार्यांना करण्यात आली असल्याची  माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. येथे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक तसेच मराठा समाजातील गरीब मुलांना शहरी भागात शिक्षण घेता यावे म्हणून प्रत्येक जिह्यात वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, परंतु वसतिगृहा साठी जागा मिळत नसल्याने निर्णयाच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीकर ज्या जिह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती विनावापर पडून आहेत अशा इमारती वसतिगृहांसाठी प्रधान्याने दिल्या जाणार आहेत.

वसतिगृह चालविण्या साठी संस्थेला प्रतिविद्यार्थी १० हजार रुपये...

इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जाणार असून  जिल्हाधिकाऱ्यांनी  वसतिगृह सुरू करण्या साठी इच्छुक असलेल्या संस्थांची निवड करायची आहे. वसतिगृह चालविणाऱ्या संस्थांना सरकारकडून प्रतिविद्यार्थी १० हजार रुपये दिले जातील. १०० विद्यार्थी असणाऱ्या वसतिगृहाला प्रत्येक वर्षा साठी १० लाख रुपये मिळतील. या निधीतून संबंधित संस्थेला वसतिगृहाची देखभाल आणि स्वच्छतेची कामे करावी लागतील, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment