तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

रमजान महिन्यात लोडशिटींग बंदकरण्याची सलमान खान मिञमंडळाची मागणी

अरुणा शर्मा

पालम :- दिनांक 17 में  पासुन पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या वेळी मुस्लीम बांधव रोजे  धरतात त्यामुळे या महिण्यात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विजेचे भारनियमन रद्द करावे. अशी मागणी सलमान खान मिञमंडाळाच्या वतिने विज वितरण कंपंणीचे कनिष्ठ अभियंता स्वामी यांच्याकडे निवेदना व्दारे करण्यात आली आहे.
पालम शहर आणि तालुक्यात विज वितरण च्या वतीने दरदिवशी भारनियमन करण्यात येते शहरात पहाटे साहा ते ९ वाजे पर्यंत भारनियमन करण्यात येते. या वर्षीचा पवित्र रमजान महिना दिनांक 17 में पासुन सुरू होत असुन या काळात मुस्लीम बाधव पहाटे तीन वाजल्या पासून धार्मीक कार्यास सुरूवात करतात त्यामुळे महावितरण च्या वतिने करण्यात येणारे भारनियमन गैरसोईचे होत असल्याने शहर आणि तालुक्यातील विजेचे भारनियमन रद्द करण्याची मागणी कनिष्ठ अभियंता पालम यांच्या कडे सलमान खान मिञमंडळाच्या वतीने एका निवेदना द्वारे करण्या आली. यावेळी सलमान खाँन पठाण, सय्यद ईमरान, सय्यद सिकंदर रोफ पठाण, शेख नुर, ईरफान खुरेशी, प्रेम भालेराव, मारोती मोरताटे, राहुल, सय्यद मुस्तखीन, ईमराऩ शेख, नौशीदखान सय्यद फारुख आदीनी केली आहे.


No comments:

Post a Comment