तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

आता मुलींना शिकवायचं कसं, निधीमध्ये केली कपात


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘बेटी बचाव बेटी पढ़ाओ’ या मोहिमेला राज्य शासनाकडून ठेंगा दाखवला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान निधीत ३० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आता सरकारने मुलींसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात केली तर ‘बेटी पढ़ाओ’ कसे साध्य होणार हा प्रश्न आता राज्यातील विद्यार्थिनींसमोर उभा राहिला आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाने ठरवून दिलेल्या अनुदान निधीत ३० टक्कांनी जरी कपात केली असली तरी जाहिरातीसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे स्वयंसेवी संस्था मार्फत चालविल्या जाणाऱ्या महिला व लहान मुलांच्या आधार गृहाकरता ३५ लाख रुपयाचे अनुदान देण्यात येत होतं. परंतु आता त्यात ३० टक्क्यांनी कपात केल्याने त्यांना २४ लाख ५० हजार एवढाचनिधी देण्यात येणार आहे.शाळेतून १ली ते १० वीच्या विद्यार्थिनींसाठी १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार असे प्रस्तावात म्हटले होते परंतु यामध्ये ही सरकारने ३० टक्क्यांची कपात केल्याने अवघे ७० हजार रुपये एवढीच रक्कम शिष्यवृत्ती करता मिळणार असं सांगितलं जातं आहे. यावरून मोदी सरकारने चालू केलेली ‘बेटी बचाव बेटी पढ़ाओ’ ही फक्त घोषणाच असल्याचं बोललं जात आहे.

No comments:

Post a Comment