तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 May 2018

जनावरांच्या ट्रकचा अपघात, ३० जनावरांचा होरपळून मृत्यू.


पांढरकवडा लगतच्या तेलंगाणा राज्यात कत्तलीकरिता जनावरे भरून जात असलेल्या एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रकने पिंपळकुटी येथील सीमा तपासणी नाक्यावरील सिमेंटच्या बॅरेकेट्सला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.बुधवारी रात्री १ वाजण्य़ाच्या सुमारास ही घटना घडली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्येट्रकने अचानक पेट घेतला. यामध्ये ३० जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तर अपघातग्रस्त ट्रक जळून खाक झाला आहे. यासोबतच त्यामागोमाग जनावरे भरून जात दुसराट्रक ताब्यात घेण्य़ात आला आहे. या घटनेमुळे जनावरांच्या तस्करीला प्रशासनाची मुक संमतीच असल्याचं दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment