तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

महिलांच्या नावे फेसबुक अकाऊंट काढून छळाणारा बाप्या अटकेत.


अनेक महिलांचे नावाचे फेसबुक व व्हॉटसअपचे अकाऊंट तयार करून त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या व त्यांचे वेगवेगळे फोटो काढून अश्लिल चॅटींग करणाऱ्या नांदेडच्या मच्छिंद्र बळीराम कावडे यास वर्धा पोलिसांच्या पथकाने काल रात्री अटक केली.बिअरबार मध्ये काम करणाऱ्या या ३७ वर्षीय व्यक्तीने अनेक महिलांच्या नावाने फेसबुक व व्हॉटसअपचे अकाऊंट तयार केले होते. त्या अकाऊंटवरून तो महिलांना मानसिक त्रास देत असे. जवळपास चारशे महिलांचे फोटो त्याने फेसबुक अकाऊंटवरून काढले व त्यांच्या नावे वेगवेगळी चॅटींग करून व बदनामी करून त्यांना नाहक त्रास देत असे. अश्लिल संदेश पाठविणे, अश्लिल फोटोसह व्हिडीओ तयार करणे वते फेसबुकवर प्रसारित करणे असा हा विकृत प्रकार तो गेल्या २०१७ पासून करत असे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिंदी येथील एका महिलेने यासंदर्भात तक्रार केली होती. याबाबत वर्धा पोलीस व वर्धा सायबर सेल संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपास करत होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तो स्वतः महिला संबोधून अशा प्रकारची चॅटींग करत असल्याचे निदर्शनास आले. काल रात्री वर्धा पोलिसांचे पथक नांदेड शहरात पोहंचले व त्यांनी मध्यरात्री मच्छिंद्र बळीराम कावडे यास ईश्वरनगर भागातून ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला असून, लातूर, बीड, नांदेड, नागपूर, पुणे, गोवा, गडचिरोली व वर्धा शहरामधील अनेक महिलांचे फोटो त्याने अपलोड करुन त्या माध्यमातून त्यांची बदनामी चालविली होती. वर्ध्याच्या पोलीस अधीक्षक निर्मलादेवी ज्यांनी यापूर्वी नांदेडमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी या प्रकरणाचा छडा लावून सदरच्या इसमास अटक केली आहे.सायबर सेलच्या माध्यमातून अत्यंत गोपनिय पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यानुसार हा व्यक्ती नांदेडमध्ये राहत असल्याचे त्यांना कळाले. सुरुवातीला त्याचीपूर्ण माहिती घेवून पोलिसांनी एक पथक नांदेडला पाठविले व काल मध्यरात्री त्यास अटक करण्यात आली. शिवाजीनगरच्या पोलिसांनी याबाबत वर्धा पोलिसांना चांगली मदत केल्याचे वर्धा पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस निरीक्षक पराग कोटे, पोलीस निरीक्षक ब्राह्मणे यांच्या सूचनेवरून साहाय्यक फौजदार संजय देवरकर व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारशे पेक्षा अधिक महिलांची छायाचित्रे त्याच्या मोबाईल मध्ये असून, अनेक शहरामधील महिलांना त्याने अशा प्रकारे बदनामी करुन त्यांना छळले होते. सिंदी येथीलएका महिलेने त्याच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाणे गाठले व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.अखेर अशा विकृत पध्दतीने छेडणारा व बदनामी करणारा इसम वर्धा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

No comments:

Post a Comment