तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 17 May 2018

कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द होणार?आयसीसी कडून बदलांचे संकेत.


कोणत्याही सामन्याआधी होणारी नाणेफेक ही बऱ्याचवेळा संघाचा निकाल ठरवत असते. कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेकीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे, यजमान संघ खेळपट्टीचं रुप पाहून प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी हे नाणेफेकीनंतर ठरवत असतो. मात्र आयसीसीच्या अंतर्गत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये पाहुण्या संघाच्या कर्णधाराला प्रथम फलंदाजी करायची आहे की गोलंदाजी याचं स्वातंत्र्य दिलं जाऊ शकतं.आतापर्यंत अनेक प्रसंगांमध्ये, यजमान संघाच्या जमेच्या बाजू लक्षात ठेऊन खेळपट्टी बनवली जात असे. अशा प्रकारे काम करणं ही चुकीची गोष्ट नसली तरीही अनेकदा कसोटी सामने एकतर्फी होतात. “कसोटी सामन्याची खेळपट्टी तयार करताना यजमान संघाचं मत विचारात घेतलं जाण हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. त्यामुळे बहुतांश सदस्यांनी नाणेफेकीऐवजी पाहुण्या संघाच्या कर्णधाराला गोलंदाजी किंवा फलंदाजी निवडण्याचा अधिकार द्यावा”, असं मत व्यक्त केलं आहे. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने ESPN CricInfo या संकेतस्थळाला नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे. २८-२९ मे रोजी मुंबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेतला जाणार असल्याचं समजतंय.
इंग्लंड मधील काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत २०१६ सालापासून नाणेफेकीला रामराम करत पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, इंग्लंडचा माजी खेळाडू अँड्रू स्ट्रॉस, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, पंच रिचर्ड केटलबरो, सामनाधिकारी रंजन मगदुले, शॉन पोलॉक यांची समिती नाणेफेकीच्या या जटील प्रश्नावर निर्णय घेणार असल्याचं समजतंय.

No comments:

Post a Comment