तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

ह.भ.प.बालकीर्तनकार प्रकाश महाराज फड समाजरत्न पुरस्कार २०१८ ऐकता गौरव पुरस्काराने सन्मानीत

बाळू राऊत
मुंबई ऐकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या 20 वर्षा पासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकता गौरव,जीवनगौरव,समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.यावर्षीचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2018 ह.भ.प बालकीर्तनकार प्रकाश महाराज फड विध्यार्थी ज्ञानाई गुरुकुल सेलू रा. कन्हेरवाडी ता. परळी जि. बीड  यांना मिळाला आहे. तसेच एकता गौरव पुरस्कार तुकाराम देविदास मुंडे रा. वानटाकळी ता. परळी जि. बीड यांना सामाजिक व कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानामुळे सन्मानित करण्यात आले.   तसेच क्रीडा क्षेत्रात मुरलीधर भगवंतराव मुंडे यांना राज्यस्तरीय ऐकता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा मुंबई मराठी पत्रकार भुवन , आझाद मैदान बाळशास्त्री जांभेकर चौक महानगर पालिका मार्ग मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी सेनेअभिनेता अनिल मोरे, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य तथा प्रांत अध्यक्ष प्रा.टी. पी. मुंडे सर,आमदार रामराव वडकूते,उपाध्यक्ष सिंग साहेब,मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्ष नरेंद्र बावळे,अभिनेत्री प्रेमा किरण,अभनेत्री सुदेशना नावकर,मिस कॉल चित्रपटाचे अभिनेते अरबाज खान,संयोजक अजमत खान,मुमताज खान,डॉ.एस. एन.राव,दादाराव दाडगे,प्रा.अरुण पडघम,ह.भ.प बापूसाहेब महाराज खवणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील   सामाजिक ,शैक्षणिक, क्रीडा, वारकरी संप्रदाय, आशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला व पुरुष यांना मान्यवरांच्या हस्ते  प्रमाणपत्र  देऊन पुरस्कृत  करण्यात आले. यावेळी प्रा.टी. पी.मुंडे.सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले एकता सेवाभावी संस्था ही गेल्या 20 वर्षा पासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करते . तसेच अभिनेता अनिल मोरे ,आमदार रामराव वडकूते,उपाध्यक्ष सिंग साहेब,अजमत खान यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी महाराष्ट्रातील पत्रकार छायाचित्रकार व महाराष्ट्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment