तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

डॉ. बाहेती व सोमाणी यांना भागवत भगिरथ पुरस्कार

फुलचंद भगत

वाशीम : सामाजिक व धार्मिकक्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्‌दल वारकरी प्रबोधन समिती च्यावतीने अत्यंत प्रतिष्ठेचा भागवत भगिरथ पुरस्कार 2018 बालरोग तज्ञ तथा आर्ट ऑफ लिव्हींगचे डॉ. हरिष बाहेती व तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांना जाहिर झाला असून 22 मे रोजी पुणे आळेफाटा येथील भारत भवनमध्ये आयोजित भव्य वारकरी वैष्णव मेळावा व श्रीराम चरित मानस कथा या कार्यक्रमात  सन्मानित करण्यात येणार आहे. देवी वैभवश्रीजी माताजी यांच्या मार्गदर्शनात राज्यात विविध क्षेत्रात अलोकीक कार्य करणाऱ्या विभुतींना यावेळी सन्मानित करण्यात येणार असून राज्यस्तरीय पुरस्कारात वाशीम जिल्हयातील दोन समाजसेवकांचा या पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे. सामाजिक , आध्यत्मिक क्षेत्रात डॉ. बाहेती व सोमाणी यांचे उल्लेखनिय कार्य आहे. डॉ. बाहेती यांनी आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी भागवत , हनुमान कथा, सोबतच विविध मंदिराच्या जिर्णादारात सक्रिय योगदान दिलेले आहे. नारायणबाबा तलाव, एकबुर्जी तलाव, मोक्षधाम, ग्रामसावंगा समवेत अनेक कार्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तरूणक्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी गत 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून मेळघाट येथे दीनदलित , आदिवासींना मदत, शेतकऱ्यांना प्रबोधन, पशुपक्ष्यांकरीता जलधारा, लग्नसमारंभात बेटी बचाव, बेटी पढाव व पर्यावरणाचा आठवा फेरा, एक हजारपेक्षा व्याख्यानाव्दारे प्रबोधन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेचा प्रसार, प्रचार , तरूणसागरजीचे विद्यार्थी या संस्कारमय पुस्तकांच्या 51 हजार कॉपीचे जिल्हयात वितरण, आचार्य दायमा यांच्या मार्गदर्शनात विविध धार्मिक स्थळी भागवत कथेच्या आयोजना पुढाकार, वाशीम येथे भागवत कथा आयोजन, चौदाशे वर्ष पुरातन गोंदेश्वर बालाजी मंदीराचा जिर्णाध्दार कार्यात पुढाकार , अनेक गरजवंताना मदत , समवेत विविध कार्याचा समावेश आहे. यापूर्वी त्यांना केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला प.पू. आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी, आचार्य अमृताश्रमस्वामी महाराज, शास्त्री श्री भक्ती किशोरदासजी, हभप गोदावरीताई मुंडे व देवी वैभवश्रीजी माताजी यांचे सानिध्य व आशीर्वाद मिळणार आहेत. 

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.9763007835

No comments:

Post a Comment