तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

गेवराईतील चोरून वाळू घेऊन जाणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर कार्यवाही

सुभाष मुळे...
-------------
गेवराई, दि. 16 __ येथील गोदावरी नदीच्या पात्रातून चोरून वाळू घेऊन जाणाऱ्या पाच ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने बुधवार दि.16 रोजी पकडले आहेत. जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सदरील कारवाई पहाटे केल्याने खळबळ उडाली आहे. वाळूची किंमत 30 लाख रूपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
      गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करण्यात येतो. लपून छपून वाळू घेऊन जावून विविध ठिकाणी विकली जाते.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी चोरून वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी उदमले , तहसिलदार अभय जोशी, मंडळ अधिकारी तांबरे, काशीद, कुरुलकर, नालमे, तलाठी, देशमुख, पखाले, काकडे, वाटोरे, वाकोडे, जैन, खेडकर यांच्या पथकाने केली आहे. बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास आगरनांदूर ,संगम जळगाव येथे नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारे 5 ट्रॅक्टर पकडण्यात आले.
       सदर ट्रॅक्टर हे पोलीस स्टेशन गेवराई येथे जमा करण्यात आले. पाच ट्रॅक्टर मधील वाळूची किंमत एकूण 30 लाख रुपये आहे. अन्य एक वाळू घेऊन जाणारा हायवा ही पकडण्यात आला असून अंबड व तहसील च्या ताब्यात देण्यात आले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment