तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Sunday, 13 May 2018

मनसेचा एपीएमसी व्यापाऱ्यांना इशारा...


अन्यथा कायदा हातात घेऊ - गजानन काळे मनसे शहर अध्यक्ष
प्रतिनिधी: बाळू राऊत
मुंबई दि.१४भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोदी सरकारने पाकिस्तानातून तब्बल ६० ते ६५ लाख मेट्रिक टन साखर आयात केल्याने शेतकरी व साखर उद्योगासमोरील संकट वाढणार असल्याची भीती निर्माण झाली असून देशभक्तीचे गोडवे गाणाऱ्यांना पाकिस्तानची साखर कधीपासून गोड लागू लागली असा खोचक सवाल विचारत पाकिस्तानची साखर विकत घेऊ नये तथा विकू नये अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी एपीएमसी व्यापाऱ्यांना दिला आहे. या प्रश्नी व्यापाऱ्यांनी तरी या साखर आयातीवर बहिष्कार टाकून देशभक्त असल्याची चुणूक दाखवावी असे आवाहन मनसेने एपीएमसी व्यापाऱ्यांना केले आहे.

राज्यात यंदाच्या हंगामात जवळपास ६० ते ६५ लाख मेट्रिक टना पेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. त्याशिवाय मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख मेट्रिक टन साखर पडून आहे. या अतिरिक्त साखरेचे करायचे काय या चिंतेत साखर उद्योग असताना पाकिस्तानच्या स्वस्त साखरेने साखर उद्योगाची झोप उडवली आहे. देशभक्तीचा आव आणणाऱ्या सरकारला याची जाणीव नाही की काय ? की मागच्या दोन वर्षात तुरडाळीचा घोळ करून या सरकारला या वर्षी साखर उद्योग अडचणीत आणून ऊस उत्पादक शेतकरी याचे कंबरडे मोडायचे आहे का ? असा सवाल मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी विचारला आहे.

पाकिस्तानमधील चिस्तीयन व लालूवल्ली सिंध या ब्रॅण्डची साखर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली असून या साखरेच्या गोणींवर पाकिस्तान शुगरचा शिक्का आहे. अगोदरच साखरेचे दर खाली आले असून गळीप हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे हे दर आणखीन कोसळतील व ऊस उत्पादक व साखर कारखानदारी मोठ्या संकटात सापडेल अशी भीती मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी व्यक्त केली आहे. भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी सहकाराने व जिल्हा बँका आणि खाजगी सावकारांकडून कर्ज काढून ऊस उत्पादन करतो. पण अशा रीतीने भाजप सरकार पाकिस्तानातून स्वस्त साखर महाराष्ट्रात आयात करून शेतकऱ्यांवर अन्याय करतय व आपले बेगडी देशप्रेम दाखवत असल्याचे मनसेने म्हटले आहे.

कोणत्याही परिस्थितीत मनसे हे होऊ देणार नाही. मोदी-फडणवीसांनी ही साखर घेऊन जाऊन आपल्या घरी चहा प्यावा. मात्र राज्यातील जनता ही साखर घेणार नाही आणि कोणत्याही व्यापाऱ्याने ही साखर विकण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल असा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी दिला आहे. लवकरच एपीएमसीतील सर्व व्यापाऱ्यांना याबाबतचे पत्र देणार असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment