तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर.


संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवारी दिनांक ६ जुलै २०१८ रोजी आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. तर २२ जुलै रोजी पालखीचे पंढरीत आगमन होणार आहे. आषाढी वारीमध्ये राज्यातून लाखो वारकरी सहभागी होती असतात. ६ जुलैला आळंदीतून पालखीचे प्रस्थान होणार असून ७ व ७ जुलै रोजी पुणे येथे मुक्काम राहणार आहे. तर सासवड येथे दिनांक ९ व १० जुलै रोजी पालखी मुक्काम करणार आहे. ११ जुलैला जेजुरी, १२ जुलैला वाल्हे, १३ जुलैला पवित्र निरा स्नानकरुन लोणंद येथे पालखी मुक्कामी असणार आहे.त्यानंतर १४ जुलै शनिवारी लोणंद (चांदोबाचा लिंब) येथे पहिले उभे रिंगण पार पडणार आहे. १५ जुलैला फलटण मुक्कामी असणार आहे. तसेच १६ जुलैला बरड येथून मुक्कामानंतर १७ जुलैला माऊलीच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार असून नातेपुते येथे पहिला मुक्काम राहणार आहे. १८ जुलैला मांडवी ओढा (पुरंदावडे) येथे पहिले गोल रिंगण भाविकांना पाहता येणार आहे. माळशिरस मुक्कामानंतर १९ जुलैला खुडूस (ज्ञानेश्वर नगर-विझोरी) येथील दुसरे गोल रिंगण पार पाडून पालखी वेळापूर येथे विसावणार आहे. २० जुलै तोंडले-बोंडले येथे तिसरे गोल रिंगण पार पाडून पालखी भंडीशेगांव मुक्कामी थांबणार आहे. २१ जुलैला भंडीशेगांवचे उभे रिंगण तर बाजीराव विहीरीवर गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे.रविवार दिनांक २२ जुलैला माऊलींच्या पादुकाचे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखीचा पंढरपुरमध्ये प्रवेश होणार आहे. आषाढ शुद्ध एकादशी (सोमवार) २३ जुलैला माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडल्यानंतर आषाढीचा सोहळा संपन्न होणार आहे. २७ जुलैला पोर्णिमेनिमित्त गोपाळपूर येथे गोपाळकाला उत्सव साजरा होणार आहे. त्यांनतर माऊलीच्या पादुकाचे विठृठल दर्शनानंतर पालखी सोहळा आळंदीकडे प्रस्थान करणार आहे.

No comments:

Post a Comment