तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

गेवराई येथील नगर परिषदेने बोगस कामाला लगाम घालावा

सुभाष मुळे...
-----------------
गेवराई, दि. 17 __ शहरातील राज गल्ली येथील सिमेंट काँक्रीट नाली व रस्त्याचे होत असलेल्या बोगस कामाला गेवराई नगर परिषदेने लगाम घालावा अशी एकमुखी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
       याबाबत अधिक माहिती अशी की, बहुतांश वर्षानंतर नगर परिषद कार्यालयाने या भागातील राज गल्लीतील सिमेंट रस्ते व नालीचे कामे हाती घेतलेले आहे. मात्र स्थानिक कार्यकर्त्याला लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने या कामाची खिरापत वाटली आहे. परिणामी या कामाची सुरुवातच बोगस सुरु झाली आहे. राज गल्लीतील कब्रस्तान या भागातील नालीच्या कामात तळाशी निव्वळ माती हावरी करुन फर्शी अंथरण्यात आली. या बाजुस सिमेंट काँक्रीटचा कमी वापर करण्यात आला. येथे असलेल्या बोळीतील रस्ता कामात कोरडी कचखडी पसरविण्यात आलेली आहे. खडी, वाळू, सिमेंट या काँक्रीट चा वापर अत्यंत कमी थीगनिस असून झालेल्या या कामाची कालांतराने वाट लागणार आहे.
       या कामाची रितसर चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. दिलेल्या या निवेदनात शेख रईस, अब्दुल कादर, अतिख राज, सय्यद सुलतान, अबु तालेब, तोहीफ पठाण, रौफभाई बागवान, सय्यद आतीख, आखिल मिस्त्री, इलियास अहेमद, शेख सादेख, फिरदोस कुरेशी आखिल कुरेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment