तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पैलवान मुरलीधर मुंडे राज्यस्तरीय "एकता गौरव" पुरस्काराने सन्मानित

महादेव गिते
परळी वैजनाथ :-  तालुक्यातील तळेगाव येथील जयहिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष , श्री संत भगवान बाबा व्यायाम शाळेचे संस्थापक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा श्री.तुळजाभवानी दुध संकलन केंद्राचे संस्थापक पैलवान मुरलीधर मुंडे यांची  एकता सेवाभावी संस्था,महाराष्ट्र राज्य, परभणीच्या वतीने राज्यस्तरीय क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "एकता गौरव" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे करण्यात आले.

     एकता संस्थेच्या वतीने मराठी पत्रकार भुवन आझाद मैदान बाळशास्त्री जांभेकर चौक मनपा मुंबई येथे सोमवारी रोजी आयोजित कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष जयशिंग सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, शाल-श्रीफळ आणि सन्मानपत्र असे आहे. मुंडे यांना पुरस्काराने

मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात   प्रा.टी.पी.मुंडे सर प्रदेश सरचिटणीस काँग्रेस आय तथा प्रांताध्यक्ष एकता सेवाभावी संस्था,  आ.रामराव वडकुते,  सिनेअभिनेत्री मुंबई प्रेमा किरण, सिनेअभिनेत्री मुंबई सुदेशना नावकार, नरेंद्र वि.वाबळे मराठी पत्रकार संघ मुंबई, चित्रपट अभिनेते अनिल मोरे, मिस कॉल चित्रपटाचे अभिनेता अरबाज खान ,प्रांत सल्लागार अँड.बारी सिद्दीकी ,प्रा.सत्येंद्र राऊत साहित्यकार उस्मानाबाद, अरुण मराठे प्रसिद्ध उद्योजक परभणी,अरुण पडघम,दादाराव दाडगे यांच्यासह विविध, आदींसहीत
मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. 
  
आपल्या मनापासून जिद्द व तळमळ उराशी बाळगून आपण करत असलेली समाजसेवा यामुळे एकतेचे वृक्ष राष्ट्रभर वाढवावे याबद्दल एकता.सेवाभावी संस्थेच्या वतीने आपले भुषण वाढवित व योगदान लाभावे, त्यांचा गुणात्मक विकास व्हावा या उद्देशाने क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल योगदान देणार्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.

     परळी तालुक्यातील सामाजिक,शैक्षणिक व राजकिय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तीमत्व म्हणून पैलवान मुरलीधर मुंडे यांची ओळख आहे.   शहरापासून जवळच असलेल्या तळेगाव येथे  सुंदर अशी व्यायाम शाळा सुरू केली आहे. त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना ही क्रीडा क्षेत्रात वाव मिळावी म्हणून स्व खर्चातुन श्री संत भगवान बाबा व्यायाम शाळा सुरू केली असून या शाळेत गेल्या पाच वर्षांपासून मुलांना त्या तालमीत शिक्षण देत अनेक मल्ल त्यांनी घडविले आहेत. प्रामाणिक पणाच्या भूमिकेतून ते काम करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी जयहिंद प्रतिष्ठान व श्री संत भगवान बाबा व्यायाम शाळेच्या माध्यमातून उल्लेखनिय सामाजिक कार्य केले आहे.तसेच शैक्षणिक कार्यासोबतच हुंडाबंदी, शेती विषयक मार्गदर्शन शिबीर, स्वयंसहाय्यता बचत गट  पशुसंवर्धन शिबीर, दुग्धव्यवसाय मार्गदर्शन शिबीर, दारूबंदी, संस्कृती संवर्धन, गरजुवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आहे. तसेच त्यांनी जिल्हास्तरीय व तालुका पातळीवरचे कुस्ती परिषदेचे आधिवेशन घेण्यात आलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत एकता संस्थेच्या वतीने त्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते हा एकता गौरव पुरस्कार देऊन सहपरिवारासह गौरव करण्यात आला.

   दरम्यान पैलवान मुंडे म्हणाले की, गेल्या पाच  वर्षांपासून अखंडपणे मी निस्वार्थ क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल माझा गौरव म्हणजे माझ्या  निस्वार्थ कार्याची पावती म्हणून मला हा पुरस्कार मिळाला आहे. माझ्या या कार्यात सर्वात मोठा वाटा हा मित्र परिवाराचा असल्याचेही यांनी यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले.

     पैलवान मुरलीधर मुंडे यांना सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर, वकील, पत्रकार, विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक, संस्थेचे पदाधिकारी, नातेवाईक मित्रपरिवार आदिंसह सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार संस्थेचे अध्यक्ष अजमत खान यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment