तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

तेल्हारा शहरातील पाणीपुरवठा काही दिवसांपासून प्रभावित


तेल्हारा पालिकेचा नियोजनशून्य कारभार
शहरवासीयांची पाण्यासाठी पायपीट
तांत्रिक कारण केले जात आहे समोर
नळ कनेक्शन धारकांना कुठलीच पूर्व सूचना दिल्या गेली नाही.
विशाल नांदोकार
तेल्हारा:  शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रभावित झाला असून प्रभावित करण्यापूर्वी तेल्हारा शहरातील नळ धारकांना कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न दिल्या गेल्याने शहरातील नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच पायपीट होत आहे.
       तेल्हारा शहराला तालुक्यातील वारी भैरवगड येथील वाण प्रकल्पातून पाणीपुरवठा केल्या जातो. बोअरवेल ची संख्या सात ते आठ असून त्यातील केवळ दोनच बोअरवेल सुरू आहेत त्यामुळे शहरात वारीच्या वान धरणातून पाणीपुरवठा केल्या जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः प्रभावित झाल्याने शहरात पाणी टंचाईला शहरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने हा पुरवठा बंद झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. परंतु त्यावर उपाययोजना करण्यास पालिका प्रशासनाला पूर्णतः अपयश आले आहे.
      सध्या लग्नसराईच्या धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच शहरातील पाणी पुरवठा प्रभावित केला आहे. त्यामुळे वरवधू पित्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
     शहरातील पाणीपुरवठा प्रभावित करण्यापूर्वी शहरातील नागरिकांना पूर्व सूचना देने आवश्यक असतांना ती दिल्या न गेल्याने शहरातील नागरिकांची प्रचंड धावपळ होत आहे. त्यामुळे  नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना त्रास होत आहे.
'शहराला पाणीपुरवठा करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली. मशीनच्या एअर पकडल्याने ही समस्या निर्माण झाली असून ते दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. '
                 मनोहर अकोटकार
        मुख्याधिकारी न प तेल्हारा

No comments:

Post a Comment