तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

डीएसकेंच्या पुतणी, जावयासह सीईओला अटक.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्या अडचणीत भर पडली आहे. बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने डी. एस. कुलकर्णी यांची पुतणी, जावई आणि डीएसके डेव्हलपर्सचे सीईओ यांना अटक करण्यात आली.पुतणी सई केदार वाजपे (३८), जाकई केदार काजपे(४२) आणि सीओई धनंजय पाचपोर या तिघांना शिवाजीनगर येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुह्यात अटक केली. या गुह्यात यापूर्वी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना अटक झाली आहे तर मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्याकर गुन्हा दाखल आहे.डी. एस. कुलकर्णी यांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याने त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. पोलीस कोठडीनंतर पती-पत्नी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. या गुह्याचा तपास पूर्ण झाला असून त्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहेत. दरम्यान गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये डी. एस. कुलकर्णी यांच्या भावाची मुलगी सई, जावई केदार आणि कंपनीचे सीईओ पाचपोर यांना अटक केली. या गुह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने डी. एस. के. यांचे घर, कार्यालयावर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.

No comments:

Post a Comment