तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

जिंतूरात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा वतीने अभिवादन

जिंतूर प्रतिनीधी
शहरातील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चा वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजता साजरी करण्यात आली
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती 14 मे रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते याचेच औचित्य साधून शहरातील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व शहरातील सर्व समजतील नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजीत जागेवर जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम प्रतिमेचे पूजन मान्यवरांचा हस्ते करण्यात आले त्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर मान्यवरांनी आपले विचार मांडले यावेळी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व शहरातील प्रतिष्टित नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..

No comments:

Post a Comment