तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

जिल्हा बँकेच्या अध्यक्षाची आज निवड,हिंगोलीची मते ठरणार निर्णायक.

प्रतिनिधी
परभणी:-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाची निवड मंगळवारी (१५ मे रोजी) होत आहे.ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची झाल्यास हिंगोली जिल्ह्यातील संचालकांची मते निर्णायक ठरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही निवडणुक बिनविरोध झाल्यास अध्यक्षपदी सुरेश वरपुडकर यांचीच वर्णी लागणार असल्याचेही बोलल्या जात आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक मे-२०१५ मध्ये झाली होती. या निवडणुकीनंतर अध्यक्षपदी बोर्डिकर गटाचे कुंडलीकराव नागरे यांची अध्यक्षपदी निवड झाली. मात्र त्यांच्या अकाली निधनाने हे पद रिक्त झाले. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड आता नव्याने होत आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या २० जणांचे मतदान आहे. या पैकी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना परभणीत येण्यास न्यायालयाची बंदी असल्याने ते मतदान प्रक्रीयेत भाग घेऊ शकणार नाहीत. तसेच आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे संचालकपद अपात्र ठरविण्यात आल्याने तेही या प्रक्रीयेत भाग घेणार नाहीत. उर्वरीत १८ संचालकांचे मतदान घेतले जाणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश वरपुडकर आणि रामप्रसाद बोर्डिकर या दोन मात्तबरांनी निवडणुकीत भाग घेतल्याने प्रतिष्ठेची ठरली आहे.माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांच्यागटाकडे स्पष्ट बहुमत असल्याचे बोलल्या जात असल्याने ही निवडणूक बिनविरोध बोलल्याचे संकेत मिळत आहेत. सुरेश वरपुडकर हे स्वत:कडे अध्यक्षपद खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी बोर्डिकर गटानेही तयारी केली आहे. यांच्या गटा तर्फे विजय जामकर यांचे नाव चर्चील्या जात आहे. बहुमतासाठी दहा संचालकांचे मतदान हवे आहे. वरपुडकर गटाचे सहा संचालक आहेत. यात ते स्वत:, पंडीतराव चोखट, माजी आमदार सुरेश देशमुख, द्वारकाबाई कांबळे, करुणा कुंडगीर व लक्ष्मणराव गोळेगावकर यांचा समावेश आहे. तसेच हिंगोलीतून सुरेश वडगावकर, नाईक आणि अंबादासराव भोसले हे तिघेही वरपुडकर गटाकडेच येतील, असा दावा वरपुडकर गटाकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केवळ एका मतासाठी तयारी करावी लागणार आहे. या उलट दुसऱ्या बोर्डिकर यांच्या गटात विजय जामकर, हेमंतराव आडळकर, प्रभाकर वाघीकर, भगवान सानप,आमदार तानाजी मुटकुळे, सुनीता गोरेगावकर यांचे समर्थन असल्याचा दावा केल्या जात आहे.संचालक बालाजी देसाई, राजेश विटेकर, अन्य एक संचालकांबाबत संभ्रमावस्था सध्या तरी दिसून येत आहे. सध्या उद्या होणाऱ्या या निवडणुकीवर परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीचा प्रभाव कितपत पडेल, याकडेही सभासद शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

No comments:

Post a Comment