तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

तेल्हारा शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहचवा


शिवसेनेच्या वतीने तेल्हारा न.प.मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी

शहरांतील नवीन काँक्रीट रस्ते अंदाज पत्रकानुसार करा,
मागील झालेले काँक्रीट रस्त्याचे सिमेंट निघून गेले आहे त्यांचे पूर्ण सिलकोट करा व शहरांतील स्मारके व उद्यान यांचे काम चांगल्या प्रकारे करा
तेल्हारा ता.प्रतिनिधी
तेल्हारा शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे ज्यामूळे शहरातील नागरिकांची पिण्याचा पाण्यामुळे भटकंती होत आहे तसेच काँक्रीट कामे मोठ्या प्रमाणात सूर आहेत या कामांवर इंजिनिअर हजार ठेवा व स्मारक व उद्यानाची कामे पूर्ण करा मागील काँक्रीट रस्ते सिलकोट करा
काही दिवसांपासून तेल्हारा शहरांमध्ये नगरपालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे तेल्हारा शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे तेल्हारा शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात यातना सहन कराव्या लागत आहेत आपण कोणत्याच प्रकारची पूर्व सूचना न देता शहरामध्ये पाण्याचा तुटवडा कायम आहे शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहचवा यात तेल्हारा नगर पालिकेची जवाबदारी आहे आपल्या जवाबदारीवर खरे उतरून आश्वासनाची खैरात न वाटता लवकरात लवकर शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहचवावे
तसेच शहरामध्ये सुरू असलेले काँक्रीट रस्ते व नाल्या यावर योग्य लक्ष्य देऊन अंदाजपत्रकानुसार योग्य पध्दतीने काम करून घेण्यात यावे व शहरांमध्ये काँक्रीटीग ची कामे सुटीच्या दिवशी नकरता नगर पालिका सुरू असताना संबंधित इंजिनिअर यांच्या उपस्थितीत काम करण्यात यावे तसेच शहरातील जिजाऊ व अहिल्यादेवी उद्यान शिवाजी महाराज पुतळा चौक तशेच स्मशानभूमीच्या सौंदर्यकरणाचे काम सुरू असून लवकरात लवकर चांगल्या प्रकारे काम पूर्ण करा व जनतेसाठी खुले करण्यात यावे व एका वर्षाअगोदार शहरामध्ये काँक्रीट कामे करण्यात आली होती यामध्ये काही रस्त्याच्या कामाचे काँक्रीट निघाले आहे या रस्त्यांमध्ये 100 टक्के सिलकोट करण्यात यावे तसेच तेल्हारा शहरातील मुख्य रस्ता आंबेडकर उद्यान ते माळेगाव नाका पर्यंत रस्त्यात पडलेले गॅप व गड्डे त्वरित बुजविण्यात यावे अन्यथा शिवसेना आपल्या पध्दतीने शिवसेना स्टाईलमध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन छेडेल व याची स्वर्वस्वी जवाबदारी प्रशासनाची राहील यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव उपशहर प्रमुख संतोष साबळे निलेश मुरेकर अमर ठाकूर माजी शहरप्रमुख पप्पू सोनटक्के राजेश वानखडे भैय्या खारोडे निलेश धनभर विवेक खारोडे देवानंद फोकमारे अजय गावंडे सचिन मोरे विलास भटकर गजानन सोनटक्के सचिन खडसान अनिकेत मोहोड श्याम माहोरे गोलू सोनटक्के अंकित खोपाले संतोष राठी हेमंत अवचार पप्पू कंगटे शेख इरफान निलेश तायडे गजानन मोरखडे संतोष ठाकरे विशाल नांदोकार संतोष सोनोने उमेश चौधरी राहुल सोनटक्के चेतन जमालपुरे अजय गवळी प्रशांत बावस्कार तसेच समस्त आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते

No comments:

Post a Comment