तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजींच्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचा उपक्रम

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.१४- श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तथा,भागवतभूषण पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या अमृत वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दि.१६ मे ते शनिवार २६ मे २०१८ दुपारी २ ते ७ या वेळेत वैद्यनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अधिक मासानिमित्त देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत संपूर्ण जगभर ज्योतिषशास्त्रासाठी परिचित असलेले तथा नुकताच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विश्वस्त म्हणून नियुक्त झालेले सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तथा,भागवतभूषण पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या अमृत वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.अधिकमासात आयोजित केलेल्या या भागवत कथेने परळीकरांना मोठी पर्वणीच भेटणार आहे.

पुरुषोत्तम मासारंभादिवशी म्हणजेच बुधवार दि.१६ मे रोजी या कथेची सुरुवात सायंकाळी ५ वा. वैद्यनाथ मंदिर येथून भव्य शोभायात्रेने होणार आहे.शोभायात्रेनंतर श्रीमद भागवत पूजन , व्यास पूजनानंतर कथेची सुरुवात होऊन आरती होणार आहे.दि.१७ मे गुरुवार ते २६ मे शनिवार अनुक्रमे श्रीमद भागवत महात्म्य,गोकर्ण आख्यान,नारद चरित्र,भीष्माचार्य प्राणत्याग,परीक्षिती चरित्र,हिरण्य कश्यप वध, शिव सती चरित्र,कपिल अवतार,जडभरत चरित्र,आजामील आख्यान,प्रल्हाद चरित्र,नरसिंह अवतार,समुद्र मंथन,वामन अवतार,परशुराम चरित्र,श्रीराम अवतार,श्रीकृष्ण जन्म,कृष्ण बाललिला,गोवर्धन पूजा,माखनचोर लिला,रासलीला,गोपीगीत,कंस वध, उद्धव - गोपी संवाद,रुक्मिणी विवाह,श्रीकृष्ण सुदामा भेट,भागवत धर्म,श्रीकृष्ण निजधाम गमन अशा कथांचे रसास्वादन भक्तांना भेटणार आहे.

भक्त - भगवंतांच्या कथा असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक - भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शरद झाडके,सचिव राजेश देशमुख,प्रा. बाबासाहेब देशमुख,नंदकिशोर जाजू,प्रा.प्रदीप देशमुख,अनिल तांदळे,बाबुराव मेनकुदळे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे,नागनाथ देशमुख,रघुवीर देशमुख,शरद मोहरीर,बाळू पुजारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment