तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

आता ३६ दिवसांनी विवाह मुहूर्त


जिल्हात अधिक मासामुळे थंडावली लग्नसराईची धामधूम
परळी/प्रतिनिधी 
दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मास महिन्याला सोमवार वैशाख शुद्ध तृतीयापासून सुरुवात होत अाहे. त्यामुळे लग्नसराईची धामधूम शनिवार, १२ मे पासून थांबली असून आता ३६ दिवसांनंतर पुन्हा लग्नसराईला सुरुवात होणार आहे. मात्र, जून महिन्यात मृग नक्षत्राला सुरुवात होत असल्याने सर्वत्र खरीप हंगामातील पेरणीची लगबग असते. त्यामुळे काही लोकांना लग्नकार्यात सहभागी होता येणार नाही असे परळी येथील बालाजी प्रसादराव कुलकर्णी यांनी सांगितले.

सोमवार, दि. १६ मे पासून अधिक मासारंभ होणार असल्यामुळे शेवटचा विवाह मुहूर्त असलेल्या शनिवार, दि. १२ मे रोजी सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू होती. १८ जूनपासून पुन्हा लग्नसराईला सुरुवात होणार आहे. यात जून महिन्यात २३, २८, २९ असे मुहूर्त असून जुलैमध्ये १, २, ५, ६, ७, १०, २० व २५ या तारखेला लग्न मुहूर्त आहेत. त्यानंतर चातुर्मासाला सुरुवात होते. यामुळे पुन्हा चार महिने लग्न तिथी नाहीत. परळी येथील बालाजी प्रसादराव कुलकर्णी यांनी सांगितले  की, अधिक मास व चातुर्मासात शुभकार्ये विवाह, मौंज अशी कार्य होत नाहीत. तसेच यंदा चातुर्मास समाप्तीनंतर गुरूचा अस्त असल्याने नोव्हेंबर महिन्यात लग्न मुहूर्त नाहीत. डिसेंबर महिन्याच्या १२ तारखेपासून लग्नसराईला सुरुवात होऊन फक्त दहाच लग्न तिथी आहेत. जानेवारी २०१९ मध्ये ८ लग्नतिथी, फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक २० विवाह मुहूर्त तर मार्च महिन्यात १५ लग्न तिथी आहेत. सध्या आता प्रत्येक जण शेतीच्या मशागतीसाठी कामाला लागला आहे.
व्यवसायावर परिणाम
अधिक मासामुळे मंगल कार्यालय, केटरर्स, आचारी, वाजंत्री, ऑफसेट, खासगी वाहनवाल्यांचा महिनाभराचा व्यवसायावर परिणाम होणार आहे. लग्नसराईत अनेक बेरोजगार तरुण, महिला रोजंदारीवर काम करत होते. मात्र, त्यांच्यावर आता दुसरीकडे काम शोधायची वेळ आली आहे.

 

No comments:

Post a Comment