तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

यंदा वाशिम जिल्हा पावसाने भिजणार...!

फुलचंद भगत

मंगरुळपीर-ऊष्णतेच्या लाटेने होरपळणार्‍या वाशिम जिल्ह्यावर यंदा वरुणराजाची कृपादृष्टी होणार असुन यंदा वेळेपुर्वीच मान्सुन दाखल होणार असल्याने वाशिम जिल्हा पावसाने चिंब भिजणार असुन या पावसामुळे शेतकर्‍यासह सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे.यंदाच्या कडक ऊन्हामुळे वाशिम जिल्ह्यातील जनजिवन पुर्णतः विष्कळीत झाले असुन पिन्याच्या पान्यासाठी तर खुपच पायपिट सुरु आहे.यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला जात असुन येणार्‍या मान्सुनची सर्वजन मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मोसमी पावसाचे (मान्सून) आगमन यंदाच्या वर्षी केरळमध्ये वेळे आधीच होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने आज जाहिर केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून धडकणार आहे. केरळ मध्ये मान्सून आल्यानंतर चार दिवसांत राज्यात मान्सून धडकण्याची चिन्हे आहेत. 23 मे रोजी अंदमानला मान्सून दाखल होणार आहे. अंदमान ते तळ कोकण हा मान्सूनचा हा प्रवास 17 ते 21 दिवसांचा असतो. पण बरेचदा वादळी स्थीतीमुळं श्रीलंकेमध्ये अडकून राहतो. मान्सून दरवर्षी सर्वसामान्यपणे दि. 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मात्र, यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरण्याची चिन्हे दिसत असून, तो वेळापत्रकाच्या तब्बल 7 दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गतवर्षी केरळमध्ये वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर 30 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. केरळ किनारपट्टीजवळ दि. 25 ते 27 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज असून, त्या दरम्यान तेथे मुसळधार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे.वाशिम जिल्हा यंदा पाणीदार होणार असुन जिल्हावाशियांचा सध्याचा ऐरणीवर असणारा पाणीप्रश्न जरुर सुटेल अशी आशा व्यक्त केला जात आहे.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.9763007835

No comments:

Post a Comment