तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

कमला मिल अग्नितांडव :- रमेश गोवानी-रवी भंडारी यांना जामीन मंजूर

मुंबई:-लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडवप्रकरणी अटक करण्यात आलेले कमला मिलचे मालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी या दोघांची मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली. या दोघांनी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, तसेच पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद संपल्यानंतर न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांनी या अर्जांवरील निकाल आजसाठी राखून ठेवला होता. त्यावर निकाल देताना दोन्ही आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. जामीन मंजूर होताच या दोन्ही आरोपींना जामिन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन-तीन दिवस लागतील. आम्हाला रोख जामीन मंजूर करावा अशी विनंती केली. त्यावर न्यायमूर्तींनी आरोपींना प्रत्येकी दोन लाख रुपये रोख जमा करून उद्याच्या उद्या जामिनावर बाहेर येऊ शकतात असे नमूद करीत त्यांची मागणी मान्य केली.

No comments:

Post a Comment