तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

कौटुंबिक वादातून जावयाने केली सासरा, पत्नी व मेव्हण्याची हत्या.


अकोला- बाळापूरातील आझादनगर भागात जावयाने सासरा, पत्नी आणि मेव्हण्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. शहरातील  इबादतपूर भागात राहणाऱ्या   सै.फिरोज सै.रज्जाक याची पत्नी  माहेरी  होती. त्यांच्यात सुरु असलेला वाद बुधवारी विकोपाला  गेला. या वादातूनच सै.फिरोज सै.रज्जाक  याने रात्री दीड वाजता पत्नी शबाना सै. फिरोज , सासरा शे महेबुब , साळा सै.फिरोज शे.महेबुब यांच्यावर  धारदार शास्त्राने  वा र  केले.या मध्ये तिघांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा  परांडा येथून पोलिसांनी आरोपीस अटक केली.

No comments:

Post a Comment