तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

लाचखोर तलाठी जेरबंद, एसीबीची यशस्वी कारवाई.


चाकूर तालूक्यातील मौजे चापोली सज्जाचे तलाठी निळकंठ व्यंकटराव कुलकर्णी यांना ४ हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. फेरफार मंजूरीसाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती.चापोली सज्जाचे तलाठी निळकंठ व्यंकटराव कुलकर्णी (४५) यांनी फेरफार मंजूरीसाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. फिर्यादी, त्याचा भाऊ आणि मुलांच्या नावे फेरफार मंजुरीसाठी ही लाच मागितली होती. तडजोड करुन४ हजार रुपये स्वीकारल्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडले. पुढील तपास उपअधिक्षक माणिक बोंद्रे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment