तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 May 2018

आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे चांगल्या मताने निवडून येतील - श्री दिलीपराव देशमुख

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
काँग्रेसचे सर्व मतदार जगदाळे यांनाच मतदान करतील , एकही मतदान इकडे तिकडे जाणार नाही

हम साथ साथ है - आ. अमित देशमुख

लातूर दि 12 ---- _बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून पुन्हा मीच निवडणूक लढवावी असा दोन्ही पक्षाचा आग्रह केला होता,  मात्र माझी यावेळी इच्छा नव्हती . 18 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सहकार्य केले त्याची परतफेड करण्यास यावेळी काँग्रेस उत्सुक आहे त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील काँग्रेसचे एकही मतदान आघाडीच्या उमेदवाराशिवाय इतरांना जाणार नाही आणि अशोक जगदाळे चांगल्या मतांनी विजयी होतील असा विश्वास माजी मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या प्रचारार्थ लातूरच्या हॉटेल ग्रँड येथे आयोजित मतदारांच्या बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत व मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , आमदार अमित भैया  देशमुख, आमदार राणा जगजीतसिंग पाटील,आमदार त्रिंबक भिसे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया देशमुख, आमदार त्रिंबक भिसे, आमदार विक्रम काळे, शैलेश पाटील चाकूरकर, व्यंकटराव बेदरे, बसवराज पाटील नागराळकर, पप्पू कुलकर्णी, मकरंद सावे, संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

या निवडणुकीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ पाहता आमचा विजय निश्चित असल्याचा दावा यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
सेनाही यावेळी भाजपा सोबत नाही त्याचाही लाभ होईल असे सांगतानाच मागील  18 वर्ष श्री दिलीपराव देशमुख साहेब  यांनी या मतदारसंघात सक्षम पणे काम केले असा गौरव केला. राज्यातील विधान परिषदेच्या आणि पोटनिवडणुका राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणा-या ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेनंतर दोन्ही काँग्रेसच्या मतदारांना उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले.

हम साथ साथ है- आमदार अमित देशमुख?

या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असल्याचा दाखला देत हम साथ साथ है चा नारा आमदार अमित देशमुख यांनी दिला. बीड , उस्मानाबाद पेक्षा लातूर मधून जास्त आघाडी देऊ असा विश्वास त्यांनी दिला, धनंजय मुंडे हे मराठवाड्याचे नेते आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्र आशेने पहात आहे असे गौरोदगार त्यांनी काढले.

धनंजय मुंडे यांनी काढली स्व. विलासराव देशमुख साहेब यांची आठवण

या बैठकीत बोलतांना धनंजय मुंडे यांनी स्व. विलासराव देशमुख साहेब यांची आठवण काढतांना सहा वर्षांपूर्वी बीडच्या अशाच मेळाव्यातील प्रसंग सांगताना अमित भैया मध्ये स्व. विलासराव देशमुख साहेब दिसतात असे सांगितले.

दिलीपराव देशमुख यांची ही इंनिग संपली नाही तर नवी इंनिग सुरू होत असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment