तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15जुन रोजी अंबादास रोडे करणार आत्मदहन

पाच वर्षापासुन न्याय मिळाला नाही,
मिळाले फक्त आश्वासन.
परळी(प्रतिनिधी)तालुक्यातील कन्हेरवाडी येथील रहिवाशी अंबादास ग्यानाजी रोडे हे गेल्या,पाच वर्षापासुन आपल्या घरासमोरील रस्ता व नालीवर मुरूम,वाळु टाकुन बंद केला तो पुर्ववत चालु करावा हि मागणी शासनस्तरावर करीत आले असुन त्यांची फक्त आश्वासनावरच बोळवन केली गेल्या मुळे अखेर अंबादास रोडे हे जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे दि.15जुनला आत्मदहन करणार असुन त्याबाबतचे निवेदन त्यांनी 21/5/2018रोजी रितसर जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गावात राहणारे अंबादास रोडे यांचे घर बौध्द समाज मंदिरा जवळ असुन ग्रामपंचायतने बांधलेला रस्ता व नाली मुरूम व वाळु टाकुन बंद करण्यात आला आहे त्यामुळे गावातील सांडपाणी त्यांच्या घरात शिरत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य आहेत या प्रश्री त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय कन्हेरवाडी,पंचायत समिती कार्यालय,उपजिल्हाधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय येथे उपोषण केले आहे तर मागील वर्षी 13जुन 2017पंचायत समिती कार्यालया समोर आत्मदहन करणार असा ईशारा दिला होता त्या वेळी गटविकास अधिकाऱ्यांनी नाली व रस्त्यावरील मुरूम काढुत असे लेखी आश्वासन देवुन होते.
दरम्यान या आश्वासनालाही तब्बल एक वर्ष होत आले असुन अंबादास रोडे यांच्या कुटुंबीयांना अद्दापही त्रास सहन करावा लागत आहे.हि मागणी पाच वर्षापासुन करीत आहे तरी त्यांना न्याय मिळत नसल्याने शेवटी नाईलाजाने 15जुन 2018रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे ते आत्मदहन करणार असल्याचे अंबादास रोडे यांनी निवेदनात नमुद केले आहे व निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय बीड,मुख्यमंत्री,पालक मंत्री,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते,बीडचे खासदार,बीड पोलीस अधिक्षक,गटविकासअधिकारी परळी,परळी ग्रामिण पोलीस स्टेशन व ग्रामसेवक ग्रा.पं.कन्हेरवाडी यांना दि,21/5/2018ला पाठविल्या आहेत.तर अंबादास रोडे हे आपल्या आत्मदहन निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment