तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

उत्तर प्रदेशात भीषण अपघात, 17 जणांचा जागीच मृत्यू.


उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला आदळल्यानंतर उलटली. या भीषण अपघातात 17 जण मृत्युमुखी पडले असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील जयपूरहून गुरसहायगंजच्या दिशेनं बस प्रवास करत  होती. यानंतर मैनपुरी येथे पोहोचल्यानंतर बस डिव्हायडरला आदळली व उलटली. बस उलटून झालेल्या अपघातात 17 जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वे वर मोठा अपघात झाला होता. सोमवारी (11 जून) एक्स्प्रेस वेवर कन्नौजजवळ एका बसनं 7 जणांना चिरडलं होते. मृतांमध्ये 6 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश होता. या सातही जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

No comments:

Post a Comment