तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

‘जिओ’चा पुन्हा धमाका, दररोज देणार 3 जीबी डेटा.


मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ‘जिओ’ने आता रोज अतिरिक्त 1.50 जीबी डेटा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता 149 रुपयांचं रिचार्ज केल्यावर तुम्हाला दररोज 3 जीबी 4जी डेटाचा लाभ घेता येणार आहे. तर 799 रुपयांच्या रिचार्जवर सर्वाधिक 6.50 जीबी डेटा रोज मिळणार आहे.याखेरीज 300पेक्षा अधिक रुपयांचे रिचार्ज करणा-यांना थेट 100 रुपये व 300 पेक्षा कमी रुपयांच्या रिचार्जवर 20 टक्के सवलत मिळणार असल्याची घोषणाही कंपनीने केली आहे. जिओच्या या धमाकाऑफरचा लाभ 12 जून 2018च्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 30 जून 2018 पर्यंत रिचार्ज केल्यावरच मिळणार आहे. 12 जून ते 30 जून 2018पर्यंतयाचा कालावधी मर्यादित करण्यात आला आहे. जिओनं या ऑफरच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या भारती एअरटेलला आव्हान दिलं आहे.एअरटेलनंही गेल्या काही दिवसांपूर्वी कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये अशाच प्रकारची ऑफर दिली होती. कोणत्याही प्लॅनच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जिओ वापरकर्त्याला पहिल्याप्रमाणेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रत्येक दिवशी 100 मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यानं दिवसाला 3 जीबी डेटा संपवल्यास त्याचं नेट सुरूच राहणार असून, स्पीड कमी होणार आहे.

प्रत्येक दिवशी 2 जीबी 4 जी डेटाच्या प्लानवर मिळणार 3.5 जीबी डेटा ....

198 रुपये, 398 रुपये, 448 रुपये आणि 498 रुपयांचं रिचार्ज केल्यास जिओ युझर्सला प्रतिदिवस 3.5 जीबी डेटा मिळणार आहे. जिओ डबल धमाका ऑफरमध्ये 198 रुपयांच्या प्लॅनमध्ये महिन्याभरात 98 जीबी 4जी डेटा मिळणार आहे. 398 रुपयांच्या प्लानमध्ये 245 जीबी डेटा आणि 448 रुपयांच्या जिओ रिचार्जवर 294 जीबी डेटा आणि 498 रुपयांच्या प्लानमध्ये 318.5 जीबी डेटा वापरकर्त्याला मिळणार आहे. तसेच प्लॅनच्या वैधतेत कोणताही बदल केलेला नाही. फक्त 4जी डेटा 2 जीबीहून वाढवून 3.5 जीबी केला आहे.

3 जीबी, 4 जीबी आणि 5 जीबी डेटा प्लान मध्येही बदल...

28 दिवसांची वैधता असलेल्या 299च्या जिओ रिचार्जवर तुम्हाला 126 जीबी डेटा मिळणार आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला 4.5 जीबी डेटाला लाभ घेता येणार आहे. यापूर्वी या प्लानमधील वापरकर्त्याला 3 जीबीच्या माध्यमातून 28 दिवसांसाठी 84 जीबी डेटा मिळत होता. तसेच 509 रुपयांच्या रिचार्ज पॅकवर 154 जीबी डेटा मिळणार आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला 5.5 जीबी डेटा मिळणार आहे.

MyJio अॅपवरून रिचार्ज केल्यास मिळणार लाभ...

MyJio अॅपवरून 300 रुपयांचं रिचार्ज केल्यास 100 रुपयांची कॅशबॅक ऑफर जिओनं दिली आहे. तसेच 300 रुपयांहून कमी रिचार्जवर 20 टक्के सूट दिली आहे. त्यामुळे तुम्ही माय जिओ अॅपमधून रिचार्ज केल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment