तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 June 2018

नाशिकमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू.


मनमाडमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. याअपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळच्या सोग्रस गावाजवळ ही भीषण दुर्घटना घडलीआहे. गुरुवारी (7 जून) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना चांदवड मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाळूची गाडी आणि मिनी ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक झाल्यानं हा अपघात झाला. ट्रॅव्हल्समधील 5 जणांचा मृत्यू झाला असून हे सर्व जण कल्याण येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.  हे सर्व जण देवदर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेले होते. देवदर्शनाहून परतत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला.

No comments:

Post a Comment