तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

एटीएम मध्ये 500 च्या फाटक्या नोटा.

वसमत शहरातील दोन एटीएम केंद्रातून ग्राहकांना चक्क फाटक्या नोटा मिळाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. वसमत मधील दोन रहिवाशांना मंगळवारी हा अनुभवआला असून बँकेकडे या संबंधीची तक्रार करण्यात आली आहे.वसमत शहरातील सत्याग्रह चौकात स्टेट बँक ऑफ इंडिया व डीसीबी बँकेचे एटीएम केंद्र आहे. या एटीएम केंद्रात शहरातील कारखाना रोड वसमत येथे रहात असलेले शेख फेरोज गुलाम समदानी यांनी एटीएम मधुन ५ हजार रूपये काढले.त्यामधील ५०० रुपयांच्या ५ नोटा म्हणजेच तब्बल २ हजार ५०० रूपयांच्या नोटा फाटक्या निघाल्या. दुसरा एक प्रकार ब्राम्हण गल्लीतील गॅस एजन्सीत काम करणारे गणपत कदम यांनी एटीएममधुन १० हजार रूपये काढले. त्यातील ५०० रुपयाच्या ३ नोटा म्हणजे १ हजार५०० रुपयांच्या नोटा फाटक्या निघाल्या आहेत. याबाबत दोघा जणांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वसमत शाखेत जाऊन शाखा व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी एटीएममध्ये कॅश जमा करणारी व्हॅन त्या एटीएमजवळ आली असता शाखा व्यवस्थापक यांनी सदरील कंपनीचे अधिकारी यांना सदरील प्रकार कळविला. यावेळी एटीएम मध्ये कॅश जमा करणा-या कर्मचाऱ्यांनी सदरील फाटक्या नोटा बदलुन दिल्या. मात्र एटीएममध्ये अर्धा कागद आणि अर्धी नोट चिकटून ती कॅश करतांना संबंधीत कर्मचाऱ्यांना दिसली कशी नाही, असा प्रश्न नागरीकांमधुन व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment