मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Tuesday, 12 June 2018

लातूर-बीड-उस्मानाबादेतही 'लक्ष्मीदर्शन' चमत्कार...शंभराने मागे असलेली भाजपा 74 मतांनी विजयी!


ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील द्वंद्वामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत मंगळवारी भाजपाने बाजी मारली. भाजपाचे सुरेश धस 74 मतांनी विजयी झाले. या विजयामुळे धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे या विजयामुळे पंकजा यांची भाजपातील पत आणखी वाढली आहे. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते 'लक्ष्मीदर्शना'च्या जोरावरच भाजपाला हा चमत्कार साध्य झाला.या निवडणुकीत 1005 मतदारांपैकी 1004 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे तब्बल 100 मते कमी होती. मात्र, तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली. त्यांना एकूण526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 452 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळेबाद ठरवण्यात आली. याशिवाय, एकाने मतदाराने नोटासाठी मतदान केले. हा निकाल पाहता यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची बरीच मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीतील राजकीय द्वंद्वामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक असणारे रमेश कराड यांना राष्ट्रवादीच्या गोटात दाखल करून धनंजय मुंडे यांनी भाजपावर कुरघोडी केली होती. मात्र, ऐनवेळी रमेश कराड यांना निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायला लावून पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत रंगली होती. अखेर या लढतीत पंकजा यांनी बाजी मारून धनंजय यांना चांगलाच झटका दिला.

No comments:

Post a Comment