तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

परळीतील 80 मेगावॅटच्या खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचे गुरूवारी श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकर्पण


परळी वै दि.05परळी तालुक्यातील मलनाथपुर येथे 500 कोटी रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या 80 मेगावॅट खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा गुरूवार दि.7 जुन रोजी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

परळी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे परळीच्या विकासाला चालना मिळावी, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी ना.धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यात खाजगी तत्वावर प्रकल्प उभे रहावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

या प्रयत्नांमधुनच सोलार एज पॉवर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि व स्टर्लिंग अ‍ॅण्ड विलियम्स या कंपन्यांनी परळी तालुक्यात 500 कोटी रूपये खर्चुन 80 मेगा वॅट विज निर्मितीचा सोलार प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी मलनाथपुर, वाघाळा, म्हातारगांव या गावातील 400 एक्कर जमिन संपादीत करण्यात आली असुन, त्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथुन 80 मेगा वॅट विज निर्मीती सुरू झाली असुन सदर वीज कंपनी तर्फे महाराष्ट्र शासनाला दिली जाणार आहे. अतिशय झपाट्याने हा प्रकल्प पुर्ण करण्यात आला असुन, त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असुन यापुढेही अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

या प्रकल्पाची उभारणी पुर्ण झाल्यामुळे त्याचे लोकार्पण गुरूवार दि. 7 जुन रोजी सकाळी 10 वाजता मलनाथपुर ता. परळी येथे होणार्‍या कार्यक्रमात श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते व श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी हे मान्यवर परिसरातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

       तालुक्याच्या विकासाला चालना देणार्‍या या प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा युवक प्रदेश  उपाध्यक्ष अजय मुंडे व सोलार एज पॉवर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि व स्टर्लिंग अ‍ॅण्ड विलियम्न या कंपन्यांच्या वतीने करण्यात आले आहे.  

No comments:

Post a Comment