तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

सोनार समाज महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सुदेश पोतदार


सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 13 __ महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी म्हणून गेवराई येथील सुदेश शिवाजीराव पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
        मी समाजाचा आणि समाज माझा हे ध्येय समोर ठेवून महाराष्ट्रातील पांचाळ सोनार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व व्यवसायिक उन्नतीसाठी काम करणाऱ्या समाजाच्या एकमेव या राज्यस्तरिय शिखर संस्थेत सुदेशजी पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष धनंजय क्षीरसागर, उपाध्यक्ष सुदेशराव पोतदार, राज्य सचिव सच्चिदानंद पोतदार, बीड जिल्हाध्यक्ष सतिश महामुनी, सचिव पंकज वेदपाठक आदींनी ही नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल पत्रकार सुभाष मुळे, गेवराई येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीपराव शिंदे, गणेश कापसे, मुख्याध्यापक संभाजीराव करांडे, गोपालसेठ जाकीटे, सुभाष मुंदडा, शिवाजीराव शिंदे, राधाकिसन सोमाणी, राधेश्याम खंडेलवाल, बालाप्रसाद सोनी, रामेश्वर कापसे, राजुसेठ सोनी, रामानंद तपासे, महामुनी, ज्ञानेश्वर तपासे, नगरसेवक किशोर धोंडलकर आदींनी अभिनंदन केले आहे.
        महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुदेशदादा पोतदार व सौ. सुरेखा पोतदार यांच्या निवासस्थानी पांचाळ सोनार महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री.धनंजय दादा क्षीरसागर व पांचाळ सोनार महामंडळ महिला अध्यक्षा सौ.उज्वलाताई क्षीरसागर तसेच पांचाळ सोनार महामंडळ महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष श्री.रामानंदजी तपासे यांनी सहस्नेह भेट घेवुन सामाजिक व विविध विषयावर चर्चा केली. दरम्यान प्रसिद्ध सराफ व महामंडळाचे सल्लागार श्री.ज्ञानेश्वर तपासे, बीड जिल्हा युवक अध्यक्ष श्री.ऋषिकेशजी पंडित, सिध्देश्वर तपासे, योगेश्वर तपासे, प्रकाश तपासे, अनिल सुगडे आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांचा सत्कार देखिल करण्यात आला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment