तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

सातव्या वेतन आयोगापेक्षाही मोठ्या घोषणेच्या तयारीत मोदी सरकार.


मोदी सरकारने आपल्या ४ वर्षांच्या कार्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध गिफ्ट्स दिले आहेत. मात्र, सर्वात मोठं गिफ्ट हे येत्या वर्षात (२०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी) मिळणार असल्याचं दिसत आहे. केंद्रात सत्तेवर असलेलं भाजप सरकार येत्या १५ ऑगस्ट २०१८ रोजी दोन मोठ्या घोषणा करु शकतं. ७व्या वेतन आयोगापेक्षाही मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करु शकतात. तसेच निवृत्तीचं वय वाढवून ६२ केलं जाऊ शकतं. याचा फायदा जवळपास १ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदी सरकार करणार असलेल्या या घोषणांचा थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकांवर होणार आहे त्यामुळेच मोदी सरकारने आपलं हे ट्रम्प कार्ड अद्याप खूलं केलं नव्हतं.

No comments:

Post a Comment