तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Wednesday, 13 June 2018

अतिरिक्त आयुक्त संजय घरत अटकेत, मुख्यालयातच घेत होते लाच.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाच स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं असून धक्कादायक बाब ही आहे की ते मुख्यालयात बसूनच लाच स्वीकारत होते.अनधिकृत बांधकामा विरूद्ध कारवाई करू नये म्हणून घरत यांनी ३५ लाख रूपयांची लाच मागितली होती. यातील ५ लाख रूपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आलं आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. इतक्या मोठ्या पदावरील अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने जबरदस्त खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment