तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 June 2018

मंगरुळपीर आगाराचे ११वाहक चालक निलंबीत


स्थानक प्रमुख मिर्झा यांची धाडसी  कारवाई

मंगरुळपीर-राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी संपात सहभागी झालेल्या ११बस चालक वाहकांवर  ९जुन रोजी निलंबनाची कारवाइ करण्यात आली  कर्तव्यावर गैर हजर राहील्याने आगार व्यवस्थापक मिर्झा यांनी ही  कारवाई केली.
मंगरुळनापीर बस स्थानकाच्या वाहक चालकांनी दि ८जुन च्या रात्री १२वाजेपासुन  कडकडीत बंद सुरु केला राज्य शासनाने एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचार्याप्रमाणे वेतन द्यावे या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारला आहे.दरम्यान आगारातील सर्व बसेस यामुळे बंद होत्या.वास्तविकता स्थानक नियंत्रकाने प्रत्येक वाहक व चालकांची ड्युटी नियोजित बस गाड्यावर लावली
होती परंतु सर्वांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने बस गाड्या जागच्यााजागीच उभ्या राहील्या त्यामुळे
मंगरुळपीर आगाराचे अतोनात आर्थिक
नुकसान झाले या कारणाने वाहक एन.एल.वानखडे,ए.ए.पखाले,चालक एस.ए.भगत,वाहक पी.यु.चव्हाण,वाहक डि.टी.दिवनाले,चालक जी.पी.पाकधने,वाहक एस.के. ठाकरे, चालक एस के उरकडे,वाहक जी.एल.अंजनकर,चालक एम.सी.बेले,वाहक आर.डी.इंगोले यांना आगार प्रमुख मिर्झा यांनी निलंबीत केले सदर कर्मचारी कर्तव्यावर न आल्याचा अहवाल शेखर खंडेतोड  यांनी दिला  एस.टी च्या सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला परंतु संपाचा फटका प्रवाशांना बसला.विद्यार्थी,कर्मचारी यांचेसह सामान्य नागरीकांना संपामुळे त्रास सहन करावा लागला.तर खाजगी वाहन धारकांच्या पथ्यावर हा संप पडला असून पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.वास्तविक  अघोषित असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली  व खाजगी  वाहतुक दारांनी अडलेल्या प्रवाशाकडुन बस भाड्याच्या  अतिरिक्त मन मानी भाडे उकळुन खिसे  गरम केले बस स्थानक परीसरात संप काळात अनुचित प्रकार घडु नये या करितापोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.बस स्थानकात 
संप सुरु असल्याची  माहीती प्रवाशांना नसल्यामुळे अनेक प्रवाशी ताटकळत बसले.              फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835

No comments:

Post a comment