तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 June 2018

विद्यापीठात प्राध्यापिकेचा आत्मदहनाचा प्रयत्न.


संस्थेकडून गेल्या १७ महिन्यांचा पगार होत नसल्याच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने प्राध्यापक असलेल्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्र. कुलगुरू कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कल्पना गावडे (वय ५७, रा. पिंपळे गुरव) यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षारक्षक दत्तात्रेय मुठे (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे. गावडे या अप्पासाहेब जेधे महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांना महाविद्यालयाने कामावरून कमी केले होते. त्यानंतर पुन्हा कामावर घेतले; परंतु गेल्या १७ महिन्यांपासून त्यांचा पगार होत नसल्याने त्याचा पाठपुरावा करीत होत्या. त्यांना न्याय मिळत नसल्याने बुधवारी दुपारी प्र. कुलगुरू कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

No comments:

Post a Comment