तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

ट्रक-दुचाकी अपघातात दोघी मायलेकी ठार.


खामगाव अकोला रोडवरील टेंभूर्णा फाट्याजवळील वळणावर आज १४ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास खामगावकडून अकोलाकडे जाणार्या ट्रकने टेंभूर्णाकडून खामगावकडे येणार्या दुचाकी (क्र. एम.एच. २८ एयू ३९४४) ला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार चौघांपैकी उषा संदीप कुणबीथोप (२८) व जान्हवी संदीप कुणबीथोप (५) दोघी रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर या मायलेकी घटनास्थळीच ठार झाल्या. तर चालक मृतक महिलाचा भाऊ भारत श्रीराम बघे (२४, रा. देऊळगाव साकर्शा) हा गंभीर जखमी झाला. तर गजानन संदीप कुणबीथोप (८) यास मार लागला आहे.त्यांना त्वरीत सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. भारत बघे याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे. गजानन कुणबीथोप यास किरकोळ मार लागल्याने सुटी देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. अपघातानंतर या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमा होऊन वाहतूक काही काळ खोळंबली. घटनेतील ट्रकचा चालक फरार झाला आहे.

No comments:

Post a Comment