तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

संभाजी ब्रिगेड च्या जिल्हा संघटकपदी गणेश धुमाळ

सुभाष मुळे...
-----------
गेवराई, दि. 6 __ तालुक्यातील युवा उद्योजक गणेश धुमाळ यांची संभाजी ब्रिगेड च्या जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे.
       गेवराई येथील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल वायकर यांनी गणेश धुमाळ यांना जिल्हा संघटकपदी निवड केल्याचे नियुक्तीपत्र दिले. यावेळी बीड तालुकाध्यक्ष मुकुंद गोरे, महादेव बहिर, महेश मोटे, सुस्कर, गणेश धुमाळ, अनिल मोटे, सचिन आहेर, संदीप दळवी, मंगेश चोरमले, मनोज आहेर यांची उपस्थिती होती. गेली अनेक वर्षापासून धुमाळ हे समाजाच्या प्रश्नासाठी करतात. त्यांचा संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या चळवळीत सक्रिय सहभाग असून त्यांच्या या कामाची संघटनेने दखल घेतली आहे. यावेळी राहुल वायकर म्हणाले की, धुमाळ यांच्या सारख्या निष्ठावंत आणि निस्वार्थ कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड मोठी केली आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता तब्बल 27 वर्ष काम करणं सोपं नाही परंतु समाजाप्रती असलेली तळमळ त्यांना स्वस्त बसू देत नाही, म्हणून हे कार्य ते करू शकले आहेत.
       गणेश धुमाळ यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. ते निश्चितच पदाला न्याय देतील असेही ते म्हणाले. यावेळी तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे बहुसंख्य मावळे उपस्थितीत होते.

-------------------------
कटिबद्ध आहे - धुमाळ
--------------------------
कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी काम करत आलो आहे, परंतु पक्षाने आज माझ्या कामाची दखल घेतली असून खूप मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवत काम करणार असल्याचे गणेश धुमाळ यांनी सांगितले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment