तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 June 2018

नाशिक रोड कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यालाच ठार मारण्याची धमकी.


येथील मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला पुणे येथील घरात घुसून ठार मारण्याची धमकी मोक्का अन्वये गुन्हा दाखल असणाऱ्या कैद्यांनी दिली. वरिष्ठ व कनिष्ट अधिकारी तसेच कर्मचाऱ्या समोर  धमकी देण्यात आल्याने कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप कुमार बाबर असे जीवे मारण्याची धमकी दिलेल्या तुरुंग अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिकरोड पोलिसांनी दिलेली महिती अशी, दि. २७ मे रोजी सागर उर्फ चन्या अशोक बेग हा विनापरवानगीने शेजारील मंडळातील सह अपराधी यांना परस्पर भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी तुरुंग अधिकारी बाबर यांनी सागर बेग यास हटकले,त्याचप्रमाणे यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाअहवाल दिला. बेग याच्या वर्तनाबाबाबत न्यायालयाला देखील कळविले. बाबर यांनी गैर वर्तनाबाबाबत कायदेशीर कारवाई केल्याने सागर उर्फ चन्या अशोक बेग प्रचंड संतप्त झाला होता. बाबर यांच्या कारवाईचा राग मनात ठेऊन सागर बेग तसेच सहअपराधी संघर्ष बाळासाहेब दिघे, गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे, निलेश बाळासाहेब परदेशी, जयप्रकाश उर्फ सोन्या अशोक बेग, अंकुश रमेश जेधे यांनी मंडळ कार्यालयाजवळ एकत्र जमून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करून गोंधळ निर्माण करून कायदेशीर प्रक्रियेत अडसर निर्माण केला. सर्कल फाटक जोरात वाजवून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. वातावरण तणावग्रस्त बनत असल्याचे लक्षात येताच अधिकारी पी. आर. पाटील, डी. बी. पाटील यांनी कैद्यांची  समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण वातावरण अधिक संवेदनशील होत असल्याने वाकीटॉकीद्वारे कारागृहाच्या नियंत्रण कशाला घटनेची माहिती दिली. वरीष्ठ तुरुंग अधिकारी संपत आढे सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी कैद्यांची समजूत घालून वातावरण शांत केले.

No comments:

Post a Comment