तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

इंडिका कार व मोटार सायकलची टव्कर पत्रकार जबर जखमी

अरुणा शर्मा
पालम :- ताडकळस हुन पालम कडे येत असताना पालम जवळील महाराष्ट्र ढाब्या जवळ दिनांक 12 जून रोजी दुपारी 2 वाजन्याच्या सुमारात इंडिका कार क्र.MH 26 AF 2006 व हिरो मोटार सायकल MH 26 AY 9887 याची समोरा समोर टक्कर झाली यात मोटार सायकल स्वार हे पालम कडे वसुली साठी येत होते. आमर एकशिंगे हे परभणी लोकमत ऑफिस चे वसुली प्रतिनिधी आसल्याचे कळते. या टक्कर ने यांच्या उजवा पायया चे  फॉक्चर झाले. व त्याच्या छातीला आणि डोक्याला जबर मार लागला आहे. यांना पालम येथील ग्रमीण रूग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारा साठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. व नांदेड येथील सायकाळी येशोसाई हॉस्पीटल येथे उजव्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले आहे. व टक्कर होताच इंडीका कार  चालक पसार झाल्या चे कळते. सदरील जखमीचा जवाब घेउन पुढील कार्यवाही करण्यासाठी दोषी वहान व चालकावर तजविज ठेवली आहे. पालम पोलीस स्टेशनचे ठाणे आमलदार पोलीस नाईक, रामकिशन काळे यांनी सदरील वाहान पोलीस स्टेशन येथे जमा केले आहे.

No comments:

Post a Comment