तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

अमित शहा- उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा.


सिद्धीविनायकचे दर्शन घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचीही शाह यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते मातोश्रीवर उपास्थित असतानाही शहा यांनी बंद दाराआड फक्त उद्धव ठाकरे यांचीशी चर्चा केली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे. अमित शहा यांच्या भेटीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment