तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहिते मुळे जून महिन्याचा सरपंच दरबार रद्द


                                
मुंबई, दि.5. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मंत्रालयात सरपंच दरबार घेण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेमुळे मंत्रालयात आयोजित करण्यात येणारा जून महिन्याचा सरपंच दरबार रद्द करण्यात आला आहे. 
राज्यातील विविध भागातून येणाऱ्या सरपंचांची गैरसोय होऊ नये यासाठी ना.पंकजा मुंडे यांनी याद्वारे सांगितले आहे की, ग्रामीण महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सरपंच दरबार आयोजित करण्यात येतो परंतु तो जून महिन्यात होऊ शकणार नाही, सरपंचांनी याची दखल घ्यावी असेही त्यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment